Social initiative







* यंग जॉली क्लब मंडळाचे विविध कार्यक्रम *




*-- चाकणच्या सामाजिक जीवनात गेली अनेक दशके सतत कार्यरत सशक्त बिगर राजकीय सामाजिक चळवळ -- *

 

आपल्या सणाचे महत्त्व अधोरेखित करताना यंग जॉली महिला मंडळ नागपंचमीच्या काळात सर्व हेवेदावे विसरून एकत्र येतात , एकमेकांच्या हातात हात गुंफून फेर धरतात ,मंगळागौरीचे खेळ खेळून त्याद्वारे होणारा व्यायाम आरोग्यास कसा हितकारक आहे हे दाखवून देऊन आनंदात सण साजरा करतात. तसेच विविध सण परम्परेप्रमाणे हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून सर्व थरातील महिलांना एकत्र करून सण साजरे करतात.

 

दहीहंडी उत्सव साजरा करत असताना आपल्याच बांधवाना सहकार्य करीत ध्येय गाठणे हा उद्देश समोर थुं मंडळाचे कार्यकर्ते संघ भावना जोपासत कार्यकर्त्यांचे सहा मजली मनोरे उभारून विविध सामाजिक संदेश परिसरात देत असताना व समाज सुधारण्याचा ,प्रबोधनाचा नियमित प्रयत्न करीत आहेत.

 

विविध स्पर्धांचे आयोजन - आधुनिक काळात सर्व जवळ आल्याने सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झालेली आहे. या स्पर्धे मध्ये टिकण्यासाठी आपल्या युवा पिढीला कार्यक्षम बनविणे त्यांना स्पर्धात्मक बनविणे यासाठी मंडळ नेहमीच प्रयत्नशील असते, स्पर्धेची सवय व्हावी ,स्पर्धेची भीती मनातून जावी यासाठी यंग जॉली क्लब स्लो सायकल स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, सही स्पर्धा, अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करून युवा पिढी सक्षम बनविण्यासाठी यंग जॉली क्लब नेहमीच अग्रेसर असते.

* यंग जॉली क्लब, बाप्पा मानाचा ! सुभाष चौक, चाकण *

 

शैक्षणीक क्षेत्रात कार्य करत असताना यंग जॉली क्लबच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आले कि, जीवन शिक्षण मंदिर जिल्हा परिषद शाळा क्र.२ चाकण विद्यार्थिनी पावसाळ्यातहि जमिनीवर बसून शिक्षण घेत आहेत, त्या वेळी कार्यकर्त्यांनी त्या विद्यार्थिनींना बसवण्यासाठी बेंच देण्याचा संकल्प सोडला व अल्पावधीत तो आमलातहि आणला.

 

सामाजिक बांधिलकी जपत पावसाळ्यामध्ये मयत व्यक्तींचे दहन करताना स्मशानभूमी येथे पावसाळ्यामध्ये येणाऱ्या समस्यांचा विचार करून स्मशानभूमी चक्रेश्वर मंदिर, चाकण येथे शेड उभारण्यासाठी मंडळाने प्रयत्न केले व स्वतः मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करीत स्मशानभूमीच्या शेड च्या उभारणीत सिहाचा वाटा उचलला.

 

ठरावीक काळात रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताची कमतरता निर्माण होते व त्या काळात शाळा, कॉलेज बंद असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास मर्यादा येतात / या गोष्टींची माहिती समजल्यानंतर यंग जॉली क्लब ने नेमक्या याच काळात रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलनात नेहमीच अधिकचे संकलन करून चाकणमध्ये सर्वात जास्त रक्त संकलनाचा मन मिळवून समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्याचे निश्चितपणे नियमित पालन केलेले आहे, करीत आहे आणि भविष्यातहि करणार आहे.

* यंग जॉली क्लब, बाप्पा मानाचा ! सुभाष चौक, चाकण *

 

आपल्या भागात अनेक प्रौढ, महिला, बालक हे अनेक कारणांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.शरीराची नियमित तपासणी करीत नाहीत हि बाब लक्षात घेऊन मंडळ दरवर्षी जेष्ठ नागरिकांसाठी नियमितपणे आरोग्य तपासणी शिबीर लायन्स क्लब व रोटरी क्लब च्या माध्यमातून आयोजित करीत आहे.

 

मंडळ नेहमीच आपल्या जेष्ठ कार्याकार्ट्यांचा सामाजिक कार्याचा वसा जपत आलेले आहे व घेतलेला वसा-वारसा जपत आलेले आहे त्या माध्यमातून - लेक वाचवा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा,प्लास्टिक निर्मूलन, मिशन २०-२० यासारखे अनेक सामाज्यासाठी उपयुक्त ठरणारे व समाजामध्ये जनजागृती करणारे अनेक प्रकल्प यंग जॉली क्लब ने हाती घेतले व यशस्वीरीत्या पार पाडलेले आहेत तसेच दरवर्षी समाज प्रबोधनाचे विविध प्रकल्प आयोजित करीत आहेत.

 

आपण भारत देशात राहतो या देशाचे वैशिष्ठ्य म्हणजे एकमेकांना सह्कार्य करण्याची वृत्ती. देशात अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती आलेली आहे .त्या प्रत्येक वेळी मंडळाने आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. व जीवनवश्यक गोष्टींचा पुरवठा केलेला आहे. उदा. भाजे येथे कोसलेली दरड, माळीण दुर्घटना ,केरळ सुनामी दुर्घटना ,सांगली-कोल्हापूर पुरस्तिती.

* यंग जॉली क्लब, बाप्पा मानाचा ! सुभाष चौक, चाकण *

 

समाजात असणाऱ्या गरजवंतांविषयी मंडळ नेहमीच संवेदनशील राहिलेले आहे.शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असो त्यांचे पालकत्व स्वीकारणे असो अथवा अनाथ मुलांना आर्थिक शालेय मदत करण्यास, सहकार्य करण्यास यंग जॉली क्लब नेहमीच अगेसर राहिलेले आहे.

 

भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिन या राष्ट्रीय सण|बद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे. यंग जॉली क्लब हि राष्ट्रीय सण दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरी करत आहे. स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवि मंडळाने दैदिप्यमन पद्धतीने साजरे करून स्वातंत्र्याचे महत्व व गरज आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजासमोर मांडून स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून कार्यरत असणाऱ्या मंडळाचे कार्य सर्वांसमोर मांडले आहे व समाजाचे प्रबोधन कार्य करीत आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र दिन व कामगार दिन आयोजित करून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करते.

 

यंग जॉली क्लब आपल्या संस्कृतीचा नेहमीच आदर करीत आलेली आहे. अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करीत असताना मंडळ शनिजयंती, शनी आमावस्या, गणेश जयंती, एकादशी असे अनेक कार्यक्रमात राबवते.होम-हवन, सप्ताह, संताजी महाराज जगनाडे पालखी सोहोळ्याच्या सर्व वारकर्यांना अन्नदान असे अनेक कार्यक्रम यंग जॉली क्लब अतिशय भक्तिभावाने पार पाडत आहे.विविध भागातून नामांकित प्रवचनकार, कीर्तनकार बोलावून समाज प्रबोधनाचे कार्य मंडळ अविरतपणे करीत आहे.

-- चाकणच्या सामाजिक जीवनात गेली अनेक दशके सतत कार्यरत सशक्त बिगर राजकीय सामाजिक चळवळ --

 

सामाजिक बांधिलकी जपत , माणुसकीची भावना जोपासत , दुष्काळाचे सावंट लक्षात घेऊन उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई संकट लक्षात घेऊन मंडळाने श्रमदान व आर्थिक मदत उभारून चाकण चाकण रुग्णालयात पाण्याची सिमेंटची टाकी बांधून सामाजिक कार्य केलेले आहे.

 

जिल्हा परिषद शाळा चाकण (जीवन शिक्षण मंदिर) पाण्याची टाकी.

 

देशाची भावी पिढी घडवण्याचे सामर्थ्य शाळांमध्ये , संस्कारामध्ये असते हे लक्षात घेऊन व सर्वाना सर्वाना शिक्षण मिळावे या उद्देशाने यंग जॉली क्लब ,चाकणने सन १९७९ साली ' ईगल बालक मंदिर ' या नावाने संस्कार वर्ग व अंगणवाडी ना नफा ,ना तोटा या तत्वावर स्थापना केली व या उपक्रमाचे त्यावेळी अनेक मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.
ईगल बालक मंदिरच्या माध्यमातून मंडळाचे हे कार्य आजतागायत उत्साहात चालू असून त्यामध्ये काळानुसार आवश्यक बदल केल्याने सध्याच्या युगात ईगल बालक मध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ व स्पर्धा निर्माण होते हि चढाओढ म्हणजे मंडळाच्या कार्याची पावती आहे.